Spread the love
Loksabha Election Dates

Superman नक्की बना

लोकसभा निवडणुकीच्या तारखा (Loksabha Election Dates) जाहीर झाल्या आहेत. त्या तारखा लगेच तुम्ही आपल्या मोबाइलमध्ये अलार्म लावून ठेवा आणि मतदानाचा हक्क बजावा म्हणजे बजावाच. लक्षात ठेवा तुम्ही जर मतदान केलं नाही आणि योग्य उमेदवार निवडून आणला नाही तर तुम्हाला पाच वर्ष सरकारच्या नावाने उगाच बोटं मोडण्यात काढावे लागतील. त्यापेक्षा आपला हक्क बजावून खरी देशभक्ती करा. 

एका सामान्य माणसाला लोकशाहीने दिलेली हि सुपरपॉवर आहे. ती सुपरपॉवर जर तुम्ही वापरली नाही तर ती पॉवर अश्या व्यक्तीकडे जाईल जो तुम्हाला नको असेल आणि त्या पावरचा उपयोग आणि दुरुपयोग तो पाच वर्ष करेल. म्हणून एका दिवसाचे सुपरमॅन नक्की बना आणि या देशाला सुपरपॉवर बनण्याच्या मार्गावर पुढे नेईल अश्या व्यक्तींना मत द्या.

मत विकू नका. कुणाकडूनच पैसे घेऊ नका. लाचार बनू नका.

लक्ष्यात ठेवा लोकसभेच्या निवडणुकीतून आपल्याला नगराध्यक्ष नाही, मुख्यमंत्री नाही तर प्रधानमंत्री निवडायचा आहे . जो आपल्या देशाचं भवितव्य ठरवणारा असतो.

Loksabha Election Dates

खालील तारखांना कुठलंच महत्वाच काम ठेऊ नका. लक्षात ठेवा मतदानाचा हक्क हि सामान्य माणसाची सर्वात मोठी शक्ती आहे.

फेज १ - १९ एप्रिल {Phase 1 (April 19) }

  • रामटेक {Ramtek (SC)}
  • नागपूर (Nagpur)
  • भंडारा-गोंदिया (Bhandara-Gondiya)
  • गडचिरोली-चिमूर (Gadchiroli-Chimur (ST))
  • चंद्रपूर (Chandrapur)

फेज २ - २६ एप्रिल {Phase 2 (April 26)}

  • बुलढाणा (Buldhana)
  • अकोला (Akola)
  • अमरावती (Amravati)
  • वर्धा (Wardha)
  • यवतमाळ- वाशीम (Yavatmal-Washim)
  • हिंगोली (Hingoli)
  • नांदेड  (Nanded)
  • परभणी  (Parbhani)

फेज ३ - ७ मे  {Phase 3 (May 7)}

  •  रायगड  ( Raigad )
  • बारामती  (Baramati)
  • उस्मानाबाद  (Osmanabad)
  • लातूर (Latur (SC))
  • सोलापूर (Solapur (SC))
  • माढा (Madha)
  • सांगली (Sangli)
  • सातारा (Satara)
  • रतनागिरी- सिंधुदुर्ग (Ratnagiri-Sindhudurg)
  • कोल्हापूर (Kolhapur)
  • हातकणंगले (Hatkanangle)

फेज ४ - १३ मे {(Phase 4 (May 13))}

  • नंदुरबार (Nandurbar (ST))
  • जळगाव (Jalgaon)
  • रावेर (Raver)
  • जालना (Jalna)
  • संभाजीनगर (Sambhaji Nagar)
  • मावळ (Maval)
  • पुणे (Pune)
  • शिरूर (Shirur)
  • अहमदनगर (Ahmednagar)
  • शिर्डी (Shirdi (SC))
  • बीड (Beed)

 फेज ५ - २० मे {Phase 5 (May 20)}

  • धुळे (Dhule)
  • दिंडोरी (Dindori (ST))
  • नाशिक (Nashik)
  • पालघर (Palghar (ST))
  • भिवंडी (Bhiwandi)
  • कल्याण (Kalyan)
  • ठाणे (Thane)
  • मुंबई  उत्तर (Mumbai North)
  • मुंबई उत्तर – पश्चिम (Mumbai North-West)
  • मुंबई उत्तर-पूर्व (Mumbai North-East)
  • मुंबई उत्तर-मध्य (Mumbai North-Central)
  • मुंबई दक्षिण-मध्य (Mumbai South-Central)
  • मुंबई दक्षिण (Mumbai South)

मतमोजणी दिवस

04 Jun 2024

अधिक माहितीसाठी

https://www.eci.gov.in/ 

Loksabha election 2024
error: Content is protected !!
coboka